वणी : मागील चार पाच दिवसांपासून शहरात थंडीचे जोर वाढले आहे. अंगात हुडहुडी भरणाऱ्या या थंडीमध्ये अनेक निराधार तसेच भिक्षा मागून जीवनयापन करणाऱ्या लोकांचे हाल बघता संत गाडगे बाबा स्मृती दिनाचे औचित्य साधून नगर सेवा समितीतर्फे गरजूंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. शहरातील दानशूर व्यक्तिमत्व विजयबाबू चोरडिया यांच्या सहकार्याने दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
हिंदू हृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापासून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. त्यामध्ये बस स्टॅन्ड परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधीचौक, दीपक टाकीज चौपाटी, तसेच ग्रामीण रुग्णालयात थंडीत कुडकुडणाऱ्या गरजूंच्या अंगावर नगर सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी ब्लँकेट पांघरून दिली. नगर सेवा समितीतर्फे मागील 12 वर्षापासून दर रविवारी शहरात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, अपंगाना काठी वाटप असे उपक्रम राबविण्यात येत आहे.
नगर सेवा समितीतर्फे बुधवारी सकाळी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवून रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. ब्लँकेट वाटप करताना समितीचे अध्यक्ष नामदेवराव शेलवडे, दिलीप कोरपेनवार, दिनकरराव ढवस, राजू तुराणकर, प्रदीप मुके, विकास जयपूरकर, भास्कर पत्रकार, नितीन बिहारी हजर होते. तर रुग्णालयात फळ वाटप करताना समितीचे सदस्यांसह डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. कमलाकर पोहे, डॉ. विवेक गोफणे, डॉ. गोफणे, कोल्हे मॅडम, शेखर चिंचोलकर, राहुल चौधरी, संजय चिंचोलकर, कैलाश बोबडे, राजेश क्षीरसागर, ज्ञानेश्वर भोंगळे, राजेश क्षीरसागर, कवडू दुरुतकर, वामन बोबडे, अरविंद चिंचोलकर उपस्थित होते.