वणी टाईम्स न्युज : महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे अखेर महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास बंद झाले होते.
राज्य सरकारने आचार संहितेपूर्वीच नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना आगाऊ दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक संपून महायुती सरकार सत्तेत आल्यावर आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं. आता मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वणी तालुक्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आज दुपारी 4 वाजता पासून येणे सुरू झाले. टप्या टप्प्यात उर्वरित बहिणीच्या खात्यास पैसे जमा होणार आहे.