वणी टाईम्स न्युज : पोलीस स्टेशन आवारात बेवारस आणि भंगार अवस्थेत असलेल्या आणखी 123 वाहनांचा 25 मार्च रोजी लिलाव करण्यात येणार आहे. नुकतेच 19 मार्च रोजी 71 दुचाकींसह 90 वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. आता उप विभागीय दंडाधिकारी वणी यांचे आदेशाने आणखी 123 दुचाकी गाड्या लिलाव करण्याची अधिकृत सूचना पोलीस स्टेशन वणीतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
लिलाव करण्यात येणाऱ्या सर्व वाहनांची त्यांचे रजिस्ट्रेशन क्रमांक, चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकासह यादी जाहीर करण्यात आली आहे. लिलावपूर्वी जर कोणास वाहनावर मालकी हक्क सांगावयाचे असेल तर त्यांनी त्या वाहनाचे मूळ कागदपत्रासह वणी पोलीस स्टेशन येथे हरकत नोंदवावी. मुदतीत योग्य हरकत न नोंदवल्यास नियमाप्रमाणे त्या वाहनाचे लिलाव करण्यात येईल. त्यानंतर कोणतेही आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.
खालील PDF ओपन करून बघा रजिस्ट्रेशन नंबरसह वाहनाची यादी-