वणी : आपल्या अनोख्या अदांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचं नाव सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. गौतमी पाटीलचा डान्स म्हणजे लाखोंची गर्दी. आणि आता वणीतील रसिकांनाही गौतमी पाटील हिचा डान्स लाइव्ह बघायला मिळणार आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक एड. कुणाल विजय चोरडिया यांच्या पुढाकाराने आयोजित प्रेमराज पारसमल ज्वेलर्स प्रस्तुत भव्य टी -10 क्रिकेट चॅम्पियन्स लीगचे आयोजन करण्यात आले आहे. 29 डिसेंबर रोजी क्रिकेट लीग सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी वणी येथील शासकीय मैदानात प्रसिद्द नृत्यांगना गौतमी पाटीलचे बहारदार नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेमराज पारसमल ज्वेलर्स टी -10 क्रिकेट चॅम्पियन्स लीगचे हे दुसरे वर्ष आहे.
टी -10 क्रिकेट चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी होणाऱ्या क्रिकेट टीम व खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासकीय मैदानावर होणाऱ्या या भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे. क्रिकेट लीगमध्ये विजेत्या टीमला प्रथम बक्षीस 11 लाख रुपये, दुसरे बक्षीस 5 लाख रुपये मिळणार आहे. तर तिसऱ्या नंबरवर राहणाऱ्या टीमला 2.5 लाख व 4 थ्या नंबरवरील टीमला 1 लाख रुपयांचा बक्षीस दिला जाणार आहे.
विदर्भात पहिल्यांदाच अशा प्रकारचे भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेमराज पारसमल ज्वेलर्स टी -10 क्रिकेट चॅम्पियन्स लीगच्या यशस्वीतेसाठी एड. कुणाल चोरडिया, मनीष गायकवाड, उमेश पोदार, संदीप बेसरकर, राजू रिंगोले, शुभम मदान, पियुष चव्हाण, प्रकाश तुरणकार, संघदीप भगत, नंदकिशोर रासेकर, तौशीफ खान व इतर कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहे.
अखेर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळाली
गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस विभागाने वणीत डान्स कार्यक्रमाला मंजुरी देण्यास नकार दिला. मात्र कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची हमी आयोजन समितीने दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गौतमी पाटील डान्स कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली.