वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून प्रचाराने वेग पकडला आहे. वणी विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी बुधवारी झरीजामणी तालुक्यातील अनेक गावाचा दौरा करून मतदारांची भेट घेतली.
तालुक्यातील कोसारा, सिंधीवाढोना, दरा, बाळापुर, बोपापुर, चींचघाट, अडकोली, पांढरकवडा(लहान) तसेच आदिवासी बहुल झरी, शिबला, हिवराबारसा व माथार्जुन या गावात संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आदिवासी बांधवांची भेटी घेऊन महायुती सरकारने राबविलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी झरी येथे आयोजित रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रचार दौऱ्यात संजीवरेड्डी बोदकुरवार सोबत भाजपा तालुकाध्यक्ष सतीश नाकले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुन्ना बोलेनवार, शिवसेना शिंदे गट मोरेश्वर सरोदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर, माजी पं.स.सभापती राजेश्वर गोंड्रावर, भाजपा जेष्ठ नेते अशोक बोदकुरवार, बच्चू चिडे, नाना सुगंधे, लताताई अत्राम, संजय दातारकर, अनिल पोटे, अनिल विधाते व महायुती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची सुरुंग
झरीजामणी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र आताच्या घडीला भाजपने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात भाजप उमेदवाराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील दुर्गम गाव आणि पोडांवर आदिवासी नागरिक पारंपरिक ताशा आणि तुतारी वाजवून भाजप उमेदवाराचा स्वागत करीत आहे. तसेच माता बहिणी ओवाळून आशीर्वाद देत आहे. आताचे चित्र बघता या निवडणुकीत भाजपला झरी तालुक्यातून चांगली लीड मिळण्याची चर्चा आहे.