वणी टाईम्स न्युज : नागरिकांच्या सुविधेसाठी रस्ते, वीज, पाणी,आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा कर्तव्य आहे. परंतु शासनाकडे वारंवार मागणी करूनही शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता मिळत नसल्याने शेवटी मारेगाव तालुक्यातील लाखापुर येथील शेतकऱ्यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्याकडे व्यथा मांडली. शेतकऱ्याची अडचण लक्षात घेऊन राजू उंबरकर यांनी सहकाऱ्यांसह जाऊन त्याच दिवशी जेसीबी लावून स्वखर्चाने पांदण रस्ता तयार करुन दिला. पांदण रस्ता मिळाल्याने शेतकऱ्यांनी राजू उंबरकर यांचे आभार मानले आहे.
सत्तेत नसताना राजू उंबरकर हे वणी विधानसभा क्षेत्रातील गोर गरीब नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिलावर्ग यांची अडचणी दूर करण्यासाठी नेहमी तत्पर राहतात. लोकांची मदत तसेच विकास कामासाठी सत्ता नसून इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ही बाब राजू उंबरकर यांनी अनेकवेळा सिद्ध केली आहे. राजू उंबरकर यांच्या कार्यातून प्रभावित होऊन वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील महिला वर्ग व युवक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करीत आहे.
नुकतेच तालुक्यातील नांदेपेरा येथील अनेक युवा व महिलांनी राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश घेतला. पक्ष प्रवेश करणाऱ्या नागरिकांचा उंबरकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.