वणी टाईम्स न्युज : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संजय देरकर यांनी आज मंगळवार रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी येथील जत्रा रोड हनुमान मंदीरात नारळ फोडले. त्यानंतर हजारो समर्थकांसह शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या विशाल रैलीने वणीकरांचे लक्ष वेधले. तब्बल 5 ते 7 हजार लोकं संजय देरकर यांच्या नामांकन रैलीमध्ये सहभागी होते.
निवडणूक अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, टीकाराम कोंगरे, संजय निखाडे, विजय नगराळे, आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे संजय देरकर सोबत हजर होते. अर्ज दाखल केल्यानंतर शासकीय मैदान येथे आयोजित जनसभेला खासदार संजय देशमुख, माजी आमदार वामनराव कासावार, राजेंद्र गायकवाड, संजय देरकर यांनी संबोधित केले.