वणी टाईम्स न्युज : येथील सकल कुणबी समाजाने विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा दिल्याची माहिती एका प्रेसनोट द्वारे देण्यात आली आहे. जिल्हा परिषद कॉलनीतील हनुमान मंदिर सभागृहात रविवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सकल कुणबी समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांनी विचारविनिमय करून एकमताने तीन मुद्द्यांवर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा देण्याचे ठरविले.
यातील मुद्दा क्रमांक 1. अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना नामांकन मागे घेण्यासाठी समाज बांधवांनी विनंती केली असता त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. मुद्दा क्रमांक 2. कोणत्याही उमेदवाराला पक्षाच्या बांधिलकी शिवाय निवडून येणे अशक्य आहे व पक्षा शिवाय सरकार कडून विकासाकरिता पर्याप्त निधी उपलब्ध होऊ शकत नाही. मुद्दा क्रमांक 3. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याने सकल कुणबी समाजाबद्दल अभद्र टिप्पणी करून समाजाच्या भावना दुखावल्यामुळे कुणबी समाज हा भाजपा पासून दुरावला आहे. म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना सकल कुणबी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचे घोषित करण्यास आले.
बैठकीत माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे, ऍड. पुरुषोत्तम सातपुते, वणी कुणबी समाजाचे अध्यक्ष मंगेश रासेकर, ज्येष्ठ समाज बांधव जयसिंग गोहोकर, मोरेश्वर वासेकर, एन. डी. सोमलकर, जगदीश ढोके, भद्रावती येथील कुणबी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग टोंगे, मुकुटबन येथील सुनील ढाले, ऍड. घनश्याम निखाडे, शैलेश ढोके, गुलाब आवारी, कुंडलिक ठावरी, अंबादास वाघदरकर, प्रा. अनिल डहाके, पंकज पिदूरकर, रुद्रा कुचनकर, राहुल खारकर, रवींद्र गौरकार, आनंद घोटेकर, नंदकुमार भोंगळे, प्रकाश पाकमोडे, भाउराव पाचभाई, गजानन जीवतोडे, जी. के. टोंगे, अभय पानघाटे, सुरेश राजूरकर आदी कुणबी समाजाचे नागरिक उपस्थित होते.