जितेंद्र कोठारी, वणी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदार संघात मतदानाला फक्त 60 तास शिल्लक आहे. अशातच काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर विरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल एका जाहिरातीत भाजपने वापरलेल्या फंडा विरुद्ध सोशल मीडिया युजर्सनी टीकेची झोड उठवली आहे.
या जाहिरातीमध्ये सर्वात पहिले प्रतिभा धानोरकर यांचा चेहरा नंतर 8 ते 10 वयोगटातील मुल आणि मुली ओ काकू… चार कामा सांगा फक्त चार कामा..! अस म्हणताना दाखविले गेले आहे. तर व्हिडिओच्या शेवटी एका म्हाताऱ्या आजीला ओ ताई फक्त चार कामा सांगा.. मी मत तुम्हालाच देईल म्हणताना दाखविण्यात आला आहे. शेवटी एक लहान मुलगी आहेच नाही तर कुठून दाखवणार असे म्हणते.
निवडणुक प्रचारात उमेदवारांचा एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करणे काही नवल नाही. विकास कामे, भ्रष्टाचार यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलखोल केली जाते. मंचावरून थेट विरोधी उमेदवाराला आव्हान दिले जाते. परंतु भाजपने बनविलेल्या या व्हिडिओ वरुन टीकेची झोड उठली आहे.
फेसबुकवर राजू नावाच्या एका युजरने एका महिला उमेदवार विरुध्द भाजप या थराला जाऊ शकते अशी उम्मीद नव्हती.. असे लिहिले आहे. तर सुशांत नावाच्या एका फेसबुक युजरने भारतीय ट्रोल पार्टी ….एका महिलेची इतकी भीती ? सर्व करून झाल्यावर लहान मुलांना आणलं .हाच विकास समाजाचा का तुमचा ? असा प्रश्न केला आहे. या व्यतिरिक्त अनेक युजर या जाहिरात वरुन भाजपला ट्रोल करीत आहे.
बघा जाहिरातीचा हाच तो व्हिडिओ –