वणी टाईम्स न्युज : महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रचार ताफा सोमवारी झरीजामणी तालुक्यात दाखल झाला. तालुक्यातील गणेशपुर(खडकी), अडेगावं, खातेरा, वेडद, मुकुटबन, पिंप्रड, राजूर (गो.) या गावात संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गावकऱ्यांनीही प्रचार दौऱ्याला भरभरून प्रतिसाद दिला. अडेगाव येथे बाजीराव महाराज मठात दर्शन करून संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. प्रचार दौऱ्यात गावातील महिला, वृद्ध, मजूरवर्ग यांची भेट घेऊन बोदकुरवार यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर मुकुटबन येथे प्रचार करताना मुस्लिम समाजातील नागरिकांची भेट घेतली. गावातील गल्लीबोलीत फिरुन त्यांनी नागरिकांना त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रचार दौऱ्यात प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, झरी(जामनी) भाजपा तालुकाध्यक्ष सतीश नाखले, ख.वि. अध्यक्ष मुन्ना बोलेनवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर, धर्माजी आत्राम, माजी पं.स सभापती राजेश्वर गोंड्रावार, भाजप नेते अशोक बोदकुरवार, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख विनोद मोहितकर, मोरेश्वर सरोदे, बंडू वरारकर, माजी तालुकाध्यक्ष संजय दातारकर, शाम बोदकुरवार, माजी पं.स.सभापती लता आत्राम, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शांता जीवतोडे, मुकुटबन ग्रा. पं. सरपंच मिना आरमुरवार, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.