वणी टाईम्स न्युज : केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने विशेष राष्ट्रीय ई-श्रम पोर्टलवर नोंदणी अभियान 7 ते 17 एप्रिलपर्यत राबविण्यात येत आहे. तरी गीग व प्लॅटफॉर्म वर्कसनी 17 एप्रिलपर्यत या नोंदणी शिबिरात सहभाग घेवून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी किंवा https://register.esharm.gov.in/#/user/platformworker-registration या संकेतस्थळावर स्वयं नोंदणी करावी, असे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे कळविण्यात आले आहे.
या नोंदणी अभियानात गीग व प्लॅटफॉर्म वर्करची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात येत आहे. या नोंदीवरुन त्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात येणार आहे. ज्याद्वारे त्यांचे 5 लाखांची प्रत्येक कुटूंबासाठी वार्षिक आरोग्य विमा कवच 31 हजार रुग्णालयांमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती लाईमस्टोन व डोलोमाईट कामगार डिस्पेन्सरी वणी येथील डॉ. मंगला दांडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.