वणी टाईम्स न्युज : दत्त जयंती निमित्त वर्धा नदीच्या काठावर पाटाळा येथे दरवर्षी धुळ्यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेत पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी होतात. दरवर्षी प्रमाणे दत्त जयंतीचे औचित्य साधून अखिल सातोकर व मित्र परिवारातर्फे सोमवार 16 डिसेंबर रोजी वर्धा नदीच्या तीरावर भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.
नागपूर येथील अमन रक्तपेढी तसेच वणी येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात सुप्रसिद्ध डॉ.गणेश लिमजे (हृदयरोग तज्ञ), डॉ. किशोर व्यवहारे (ऑर्थो), डॉ. प्रेमानंद आवारी (स्त्रीरोग तज्ञ) डॉ सुनील जुमनाके (बालरोग तज्ञ), डॉ. विजय खापणे (अस्थीरोग तज्ञ), डॉ नईम शेख, डॉ.साहिबा शेख, डॉ. अमोल पदलमवार, डॉ. पल्लवी पदलमवार, डॉ. विवेक गोफणे, डॉ. वैशाली गोफणे आणि इतर डॉक्टर आरोग्य तपासणी करणार आहेत
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून संजय निखाडे, सुनील कातकडे, दिलीप मालेकर, इजहार शेख, उमेश बोढेकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अखिल सातोकर व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.