वणी : येथील मोतीलाल खिवंसरा गर्ल्स हॉस्टेल मध्ये 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचा 74 व्या वर्धापन दिनानिमित्त खिवंसरा कुटुंबातील वयोवृद्ध कमलाबाई खिवंसरा यांचे हस्ते व सुरेश खिवंसरा यांचे प्रमुख उपस्थीतीत सकाळी आठ वाजता ध्वजावंदन नंतर राष्ट्रगान गायन करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सायंकाळी 5 वाजता आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वसतिगृहातील मुलीनी राष्ट्रीय गीतांवर आधारित सुंदर नृत्य प्रस्तुत केले. वैष्णवी निखाडे हिने शेतकरी आत्म्हत्येवर सादर केलेले पथनाट्य पाहून उपस्थित लोकांचे डोळे पाणावले होते. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते शहीद लेफ्टीनंट वासुदेव आवारी यांचे आईवडिलांचे सत्कार करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोतीलाल खिंवसरा गर्ल्स हॉस्टेलचे संचालक प्रफुल खिंवसरा, मुख्य अथिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ. दामोधर आवारी, बाळासाहेब खैरे, वैभव ठाकरे, रवी गौरकार तसेच खिवसरा परिवार, शिक्षकवृंद, मुलींचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वृषाली कारेमोरे यांनी केले, तर आभार वार्डन राखी माणिक परचाके यांनी मानले.
एम.के. गर्ल्स हॉस्टेलची पार्श्वभूमी
मोतीलालजी खिंवसरा गर्ल्स हॉस्टेल हे वणीतील मुलींकरता असलेले पहिले खाजगी वसतीगृह आहे. ग्रामीण भागातून वणीमध्ये शिक्षण घेण्याकरिता आलेल्या मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह असावं अशी कल्पना पन्नालाल खिंवसरा यांनी मांडली होती. वडिलांच्या इच्छेला मान देऊन येथील सुप्रसिद्ध नटराज पेंट व नटराज मार्केटिंगचे संचालक प्रफुल खिवंसरा, योगेश खिवंसरा व धम्मू खिवंसरा या तिन्ही भाऊनी अथक प्रयास करुन स्व. मोतीलाल खिंवसरा मुलींचे वसतिगृहाची स्थापना केली.