वणी: प्रेस वेलफेअर असोशिएशन वणीच्या वतीने गणतंत्र दिनाच्या पर्वावर आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एस.पी.एम. शाळेच्या रंगमंचावर आयोजित या समूह नृत्य स्पर्धेत स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेच्या नृत्य पथकाने प्रथम पारितोषिक पटकाविला. सलग दुसऱ्या वर्षी स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेने स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे.
प्रेस वेलफेअर असोशिएशनच्या वतीने दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पूर्व माध्यमिक गटात 12 शाळांनी तर माध्यमिक गटात 10 शाळांनी सहभाग घेतला. सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केली. रामदेव बाबा मुकबधीर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थीनीने सादर केलेले स्वागत नृत्य आकर्षक ठरले. पूर्व माध्यमिक गटात प्रथम क्रमांक स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय क्रमांक जनता विद्यालय तर तृतीय क्रमांक वणी पब्लिक शाळेच्या पथकाने पटकाविला.
नगरपरिषद शाळा क्रमांक 7 ला प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय क्रमांक आदर्श हायस्कुल तर तृतीय क्रमांक विवेकानंद विद्यालयाने पटकाविला. संताजी इंग्लीश मिडीयम स्कुलला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार प्रतिभा धानोरकर यांचे कडून विजेत्या पथकांना बक्षीसे प्रदान करण्यात आले. नागपुर येथिल नृत्य प्रशिक्षक सुचना बंगाले व वणी येथील प्रख्यात नृत्यांगना आस्था दहेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, स्वावलंबी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, प्रेस वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष रवि बेलुरकर, सचिव तुषार अतकारे यांचे उपस्थितीत पार पडले.. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, मनसे नेते राजु उंबरकर, मॅक्रून स्टूडेंट अकॅडमीचे संचालक पियुष आंबटकर, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अजीत जाधव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. प्रेस वेलफेअरतर्फे मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तहसीलदार निखील धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी सहकार्य केले. विजेता शाळांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के व संजय खाडे यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सुत्र संचालन गजानन आसावार यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक विनोद ताजने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल बिलोरिया, रमेश तांबे, रज्जाक पठाण, डॉ किशोर चवणे, आसिफ शेख सुनिल पाटील, सागर बोढे, महादेव दोडके यांनी परिश्रम घेतले.