वणी टाईम्स न्युज: मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे एका 25 वर्षीय तरुणाने आजाराला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार 17 मे रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. दीपक भास्कर रामटेके असे मृत तरुणाचे नाव आहे. आजाराला कंटाळून दीपक यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वेगाव येथील दीपक भास्कर रामटेके हा आजारी असल्याने त्याच्या चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. शुक्रवारी सकाळी दीपक घराबाहेर गेला तर संध्याकाळी पर्यंत परत घरी आलाच नाही. रात्रभर शोध घेऊनही दीपक मिळाला नाही. शनिवारी सकाळी 7 वाजता गावालगत एका शेतात झाडावर दीपकचा मृतदेह लटकलेला आढळला.
आत्महत्येच्या घटनेबाबत पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना कळविले. पोलिसांनी मृतदेह झाडावरून खाली उतरवून पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतक दिपकच्या मागे आईवडील व विवाहित बहीण आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.