वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील कोना या गावात एका अल्पभूधारक युवा शेतकऱ्यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजता उघडकीस आली. गणेश जगन्नाथ तुराणकर (37)असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गणेश तुराणकर यांचेजवळ 3 एकर शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीच्या भरवश्यावर करायचा. नापिकी आणि खाजगी कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. त्याच्या मागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.