वणी टाईम्स न्युज : येथील दीपक चौपाटी परिसरात सुरु झंडीमुंडी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून 5 जुगाऱ्यांना अटक केली. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता करण बार समोर बडे भाई छोटे भाई दर्ग्याजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जुगार खेळताना 5 जणांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर गणपत धंदरे (58) रा. रामपुरा वार्ड वणी, परवेज सय्यद सय्यद तनवीर (22) रा. रंगनाथनगर वणी, अरूण गंगाधर पांपट्टीवार (59) रा. गणेशपुर, हुसेन वामन आत्राम (30) रा. ढाकोरी ता.वणी व कवडु गणपत कांबळे (83) रा. लालगुडा ता. वणी असे अटकेतील जुगाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून झंडी मुंडी फल्क्स बोर्ड व चार गोटया असा एकुन 5 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर याचे आदेशानुसार पीएसआय धीरज गुल्हाने, पीएसआय धनंजय रत्नपारखी पो.का. मोनेश्वर, निलेश, गजानन, वसीम यांनी केली.