वणी टाईम्स न्युज : कापसाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रक्कमेवर चोरट्याने डल्ला मारला. चोरट्याने पिकअप वाहनाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 90 हजार लंपास केले. शनिवार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता दीपक टॉकीज परिसरात सन्नी बार जवळ ही घटना घडली. याबाबत फिर्यादी शेतकरी सचिन संजय देवतळे (26) रा. गाडेघाट, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
फिर्यादी यांनी आपल्या शेतातील कापूस पिकअप वाहनात विक्रीसाठी वणी येथे आणले होते. कापूस विक्रीनंतर चुकऱ्याचे 90 हजार रुपये त्यांनी पिकअप मालवाहू वाहनाच्या कंडक्टर साईडच्या ड्रॉवर मध्ये पेपर मध्ये गुंडाळून ठेवले. गावाकडे परत जाताना दीपक टॉकीज परिसरात वाहन उभे करून कामानिमित्त थोडी दूर गेले असता अज्ञात चोरट्याने पिकअप वाहनाच्या डिकीतून 90 हजार रुपये लंपास केले. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303 (2) BNS अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास PSI धनंजय रत्नपारखी करीत आहे.