वणी टाईम्स न्युज : शहरात कुलुपबंद घर म्हणजे हमखास चोरी. अस जणू काय नियमच बनला आहे. वर्दळीच्या ठिकाणी सुद्धा चोरटे आपला हेतू साध्य करताना दिसत आहे. नांदेपेरा मार्गावरील विनायक नगर येथील मोहम्मद साकिब साजिद शेख यांचे घरी शनिवारी रात्री चोरट्यांनी धावा बोलला. घरी कोणीही नसताना चोरट्यांनी घराच्या मागील बाजूस खिडकीची ग्रील कापून घरात प्रवेश करुन बेडरूम मधील लाकडी कपाटातून 25 हजार रुपये लंपास केले. सदर घटना रविवार 13 एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी मोहम्मद साकिब शेख (36) यांचे नांदेपेरा मार्गावरील विनायक नगर येथे नूर मंजिल नावाने बंगला आहे. मो. साकिब हे एक कार्यक्रमानिमित्त शनिवारी दुपारी कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. घराच्या मुख्य दाराला तसेच लोखंडी गेटला कुलूप लावून होता. दरम्यान रात्री 2.30 वाजता सुमारास चोरटे मागील बाजूस आत शिरले. चोरट्यांनी वरच्या माळ्यावर बेडरूम मधील सर्व समान अस्तव्यस्त फेकले. चोरट्यांनी लाकडी कपाटातील ड्रॉवर तोडून त्यामध्ये ठेवलेले 25 हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी मो. साकिब शेख यांनी नोंदविली.
फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्क्वॉडला पाचारण
सदर घटनेमध्ये एफआयआर मध्ये नमूद मुद्देमालपेक्षा अधिक चोरी गेल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. घटनेनंतर यवतमाळ येथून फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्क्वॉड यालाही पाचारण करण्यात आले. चोरीच्या घटनेत सोन्याचे काही दागिनेही लंपास झाल्याची घटनास्थळी चर्चा होती. मात्र फिर्यादी यांनी फक्त 25 हजार रुपये रोख चोरी गेल्याची तक्रार दिल्याने चर्चेवर विराम लागला आहे.