वणी टाईम्स न्युज : येथील जैन स्थानक जवळ नीलकंठ मालती अपार्टमेंट परिसरात संशयास्पदरित्या अंधारात फिरताना एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. करण निरंजन धवणे (24) रा. चमेडिया नगर यवतमाळ असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी हा चोरी करण्याच्या उद्देशाने अंधारात आपले अस्तित्व लपून फिरत होता.
वणी पोलीस स्टेशन मध्ये बुधवारी रात्री 11. 45 वाजता डायल 112 कंट्रोल रुममधून मिळालेल्या माहितीवरुन नाईट ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले व पोलीस स्टाफ टागोर चौक जैन स्थानक जवळ नीलकंठ मालती अपार्टमेंट येथे पोहचले. त्यावेळी एक इसम अंधारात संशयास्पदरित्या फिरताना दिसून पडला. पोलिस दिसताच तो पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडला.
पोलिसांनी त्याचे नावपत्ता व अंधारात फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. मात्र पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी आपले नाव करण निरंजन धवणे (24) रा. चमेडिया नगर यवतमाळ असे सांगितले. आरोपी हा चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे संशयावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.