वणी टाईम्स न्युज : शहरालगत वाहणाऱ्या निर्गुडा नदीवर बांधण्यात आलेले कोल्हापुरी बंधाऱ्याचे 9 लोखंडी गेट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. फिर्यादी जलसंधारण अधिकारी सुमित राजेंद्र भागवत (30) रा. जिजाऊ नगर वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्या दाखल केला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निर्गुडा नदीवर वाघदरा गाव शिवारात संजय पंडिले यांचे शेताजवळ कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आलेला आहे. दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता सुमारास बंधाऱ्याचे जुन्या वापरते लोखंडी बर्गे गेट ज्याचा वजन प्रत्येकी 70 किग्रा. आहे, असे 9 गेट किंमत 25 हजार 200 रुपये चोरी गेल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध घेणे सुरू केला आहे.