वणी टाईम्स न्युज : क्षुल्लक कारणावरून मुलानी आपल्या वडिलांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील किशोर राऊत (29) रा. रंगनाथ नगर वणी असे आरोपी मुलाचे नाव आहे.
फिर्यादी वडील किशोर राऊत (56) यांनी वणी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादनुसार गुरुवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी जेवण करायला बसलो असता मुलगा स्वप्नील यांनी घरी अंड्याची भाजी आणली. तेव्हा वडिलांनी आज देवाचा दिवस असताना अंड्याची भाजी का आणली ? असे विचारले असता मुलानी वडिलांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी सळई व मातीची विट घेऊन पाठी व छातीवर मारहाण केली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी स्वप्नील राऊत विरुध्द 115(2), 118(1), 351(2), 351(2) व 352 BNS नुसार गुन्हा दाखल केला.