वणी : शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत लपून छपून सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकली. शिंदोला ते कलमणा जाणाऱ्या रस्त्याच्या शुक्रवार 1 डिसे. रोजी शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावून हारजीतचा खेळ खेळणाऱ्या 6 जुगाऱ्याना अटक केली. विशेष म्हणजे शिरपूर पोलिसांची कोंबड बाजारविरुद्द एका आठवड्यात ही तिसरी कारवाई केली आहे.
अंकुश कवडू गोहकर, विलास महादेव मरसकोल्हे, सुरेश बाबाराव वाबेटकर, गुजरात भास्कर थेरे, विनोद हरिदास येडे, अजित रमेश दुबे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या धाडीत पोलिसांनी 3 जीवंत कोंबडे, 6 दुचाकी व रोख रकमेसह 3 लाख 44 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 26 नोव्हे. रोजी शिरपूर पोलिसांनी तरोडा व पिंपरी कायर शिवारात सुरु असलेले कोंबड बाजारावर धाड टाकून 5 जणांना अटक केली होती.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संजय राठोड, पीएसआय रामेश्वर कांडूरे, सुनील दुबे, प्रशांत झोड, निलेश भुसे, गुणवंत पाटील यांनी केली.