सुशील ओझा, झरी : अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करुन वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला म्हणून रेती तस्कर दोघं भावांनी तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. सदर घटना झरीजामणी तालुक्यातील गवारा जंगल शिवारात शनीवार 11 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता घडली.
फिर्यादी तलाठी मोबिन हुसैन सिद्दिकी (49) रा. पांढरकवडा यांनी पाटण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रेती तस्कर अनिल रामलु कोलेकर (35) व अर्जुन रामलु कोलेकर (33) रा. बोरी (पाटण) विरुध्द कलम 132, 121(1), 303 (2), 352, 351 (2), 3(5) बीएनएस तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48 (7), 48 (8) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.