वणी टाईम्स न्युज: पैशाची बाजी लावून 52 पत्ती हारजीतचा जुगार खेळताना चार जुगाऱ्याना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवार 5 जून रोजी दुपारी 2.30 वाजता दरम्यान निलजई कोळसा खाण परिसरात ही कार्यवाही करण्यात आली.
विजय पंजाबराव मोखरकर (41) रा. सुंदरनगर, पांडुरंग झित्रू गोवारदिपे (53), रा. तरोडा, तिरुपती पोच्चम गोडगु (54) रा गांधीनगर (घुग्गुस) व हरिश्चंद्र विठ्ठल ठावरी (38), रा.बेसा, ता. वणी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपींकडून गंजीपत्ते व 4 हजार 950 रुपये रोख जप्त केले. सर्व आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.