वणी टाईम्स न्युज : शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या कापसाच्या चुकाऱ्यावर चोरट्याने डल्ला मारला. परंतु पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून चोरट्याला ताब्यात घेऊन चोरलेली 90 हजाराची पूर्ण रक्कम हस्तगत केली. सोबतच चोरट्यांकडून घटनेमध्ये वापरलेले दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. सागर अशोकराव घोसे (33), रा. अलीपूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा ह. मु. रामपुरा वार्ड वणी असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
फिर्यादी सचिन संजय देवतळे रा. गाडेगाव, ता. कोरपना यांनी 9 जानेवारी रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसाने दीपक चौपाटी परिसरात घटनास्थळी सीसीटीव्ही फूटेजची बारकाईने तपासणी करुन आरोपीला ताब्यात घेतले. सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात डिबी पथक प्रमुख पीएसआय धीरज गुल्हाने व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.