वणी : चार दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवाहित महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनीषा विजय नक्षीणे (40) रा. वांजरी ता. वणी असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वांजरी येथील मनीषा विजय नक्षीणे या महिलेनी 14 डिसे. रोजी घरातच कीटकनाशक प्राशन केले होते. कुटुंबियांना माहिती पडताच त्यांनी तात्काळ तिला वणी येथील सुगम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी महिलेचा जीव वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचार सुरु असताना सोमवार 18 डिसे. रोजी दुपारी 12.45 वाजता दरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
विष प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू बाबत वणी पोलीस स्टेशनला सूचना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून शवविछेदांसाठी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मयत मनीषा नक्षीणे हिच्या मागे पती व एक मुलगा असून तिच्या आत्महत्या मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.