वणी टाईम्स न्युज : येथील आंबेडकर चौक परिसरात वास्तव्यास एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.15 वाजता उघडकीस आली. विजय मारोती डवरे (58) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची नाव आहे. घरी कुणीही नसताना त्याने दोरीच्या साह्याने फाट्याला दोर बांधुन त्यांनी गळफास घेतला. काही दिवसा पासुन त्याची प्रकृती बरी नसल्याचे सांगितले जाते. विजय यांनी आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे.