वणी टाईम्स न्युज : मालवाहू पिकअप वाहनात गोवंश जनावरे भरून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असताना पाटण पोलिसांनी वाहन व जनावरे जप्त केली. सदर कारवाई मंगळवार 29 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजता पाटण बोरी मार्गावर दुर्भा फाटा रेल्वे क्रॉसिंग जवळ करण्यात आली. पोलिसांनी तस्करांच्या ताब्यातून 3 गोवंश जनावरांची सुटका केली. तसेच गोवंश वाहतूक करणारा पिकअप मालवाहू वाहन क्रमांक MH-29-BE-8726 पोलिसांनी जप्त केला. सदर प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
शंकर गजानन मिलमिले (22) व भोला सुरेश पडोळे (28) दोघं रा.डोर्ली ता.वणी असे आरोपी गोवंश तस्करांचे नाव आहे. जनावरांची वाहतूक करण्यासंबंधी कोणतेही वैद्य परवानगी व पावती वाहन चालकाकडे नसल्यामुळे आरोपीवर पाटण पोलीस ठाण्यात प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11(1)(a), (d), (e), (h), मोटर वाहन कायदा कलम 83, 177 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाटण पोलीस करीत आहेत.