वणी टाईम्स न्युज : एकाच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दोघांमध्ये कचरा टाकण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळ व नंतर मारहाण पर्यंत पोहचले. त्यात एकाने घरातून स्टीलचा रॉड आणून समोरील व्यक्तीवर वार केला. यात त्याच्या बोटाला दुखापत झाली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
फिर्यादी विलीन वामनराव औझे (47) रा. साई अपार्टमेंट, रवी नगर वणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कचरा टाकण्याच्या कारणावरून त्याच अपार्टमेंट मध्ये राहणारे अभय विठ्ठल होले (40) यांनी शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता वाद घातला. एवढंच नव्हे तर आरोपी यांनी शिवीगाळ करुन थापड बुक्क्यांने मारहाण केली. त्यानंतर आरोपी यांनी घरात जाऊन स्टीलची रॉड आणून त्याच्यावर वार केलं. मात्र रॉड डाव्या हाताने पकडल्याने त्याच्या तर्जनी बोटाला दुखापत झाली.
आरोपी यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. असेही तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपी अभय विठ्ठल होले विरुद्ध 118 (1), 352, 3, 51 (2) (3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ASI सुरेंद्र टोंगे करीत आहे