वणी टाईम्स न्युज : घरासमोर बांधलेल्या बकऱ्याला वाहनाचा कट लागला म्हणून समोरासमोर घर असलेल्या शेजाऱ्यात वाद झाला. वाद होऊन पंधरा दिवस झाले असता वादाची ठिणगी पुन्हा पेटली. त्यात घरासमोर कुटुंबाने उभारीने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार फिर्यादी भाऊराव नामदेव माहुरे, रा. मानकी, ता. वणी यांनी वणी पोलिस स्टेशन येथे नोंदविली.
तक्रारीनुसार फिर्यादी यांचे घरासमोर तुळशीराम निकुरे यांचा घर आहे. तुळशीराम यांच्याकडे काही बकऱ्या असून ते त्यांना घरासमोर रस्त्यावरच बांधतात. 15 दिवसांपूर्वी फिर्यादी याचा नातू आपले ॲपे वाहन घेऊन घराकडे येत असताना बकऱ्याना कट लागला. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. दिनांक 24 मार्च रोजी रात्री 8 वाजता फिर्यादी भाऊराव माहुरे, त्याची सून मनिषा शंकर माहुरे व नातू जगन्नाथ शंकर माहुरे हे घरात बसून होते.
त्याच वेळी गैर अर्जदार नितीन नंदू निकुरे, विनायक नंदू निकुरे, जीवन लेनगुरे व ईश्वर तुळशीराम निकुरे हातात लाकडी उभारी घेऊन आले व त्याचे नातू जगन्नाथ याला मारहाण सुरू केली. फिर्यादी आणि त्यांची सून हे वाचविण्यासाठी मधात आले असता गैर अर्जदारांनी त्यानासुद्धा मारहाण करून जखमी केले. आरोपी यांनी मारहाण केल्याची तसेच उभारीचा वार केल्याने नातूचा डोकं फुटल्याची तक्रार फिर्यादी यांनी नोंदविली. पोलिसाने आरोपी नितीन नंदू निकुरे, विनायक नंदू निकुरे, जीवन लेनगुरे व ईश्वर तुळशीराम निकुरे, सर्व रा. मानकी, तालुका वणी विरुद्ध कलम 118 (1), 3(5) व 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.