वणी टाईम्स न्युज : पती पत्नीचे लग्न होऊन एक वर्ष झाले म्हणून गुरुवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी एनिवर्सरी केक कापण्यात आले. जेवण करून घरचे सर्व सदस्य झोपी गेले. मात्र सकाळी उठताच घरात एकच कल्लोळ उठला. एका वर्षापूर्वी लग्न होऊन घरी आलेली आणि रात्री सर्वांसोबत लग्न वाढदिवसाचे केक कापणाऱ्या सुनेने आपल्या बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
सदर धक्कादायक घटना शुक्रवार 4 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता शहरालगत चिखलगाव येथील सदाशिवनगर येथे उघडकीस आली. साक्षी अश्विन हिवरकर (25) असे आत्महत्या करणाऱ्या नव विवाहितेचे नाव आहे. गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम नंतर विवाहितेचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्नाला फक्त एकच वर्ष झाला असता साक्षी हिने आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.