वणी टाईम्स न्युज : शहरातील दीपक टॉकीज परिसरात सतत लूटमारीच्या घटना घडत आहे. कोरपना तालुक्यातील एका व्यक्तीकडून दोघांनी बळजबरीने 1800 रुपये व मोबाईल हिसकावून नेल्याची घटनेची शाई वाळत नाही तर सोमवारी तेलंगणा येथील दोन युवकाकडून दोघांनी पुन्हा मोबाईल व रोख रक्कम लुटण्याची घटना घडली.
फिर्यादी गंगाधर नारायण मुरारी (29) रा. बोथ, जि. आदिलाबाद हा दिनांक 30 रोजी आपल्या मित्रासह दुचाकीने कामानिमित्त वणी येथे आला होता. दुपारी 1.30 वाजता दरम्यान दीप्ती टॉकीज परिसरात फिरत असताना 20 ते 25 वर्ष वयोगटातील दोन युवकांनी त्यांना अडवून बळजबरीने त्याच्या पेण्टच्या खिशातून 2200 रुपये व हुवेई कंपनीचा मोबाईल हिसकावून पळून गेले. पळून जाताना दोघं एकमेकांना अज्या आणि दिनेश नावाने हाक मारत होते.
फिर्यादी यांनी तक्रार देताच पोलिसांनी आरोपी दिनेश मेश्राम (20) व अजय येमुलवार (22) रा. खरबडा मोहल्ला वणी यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून लूटलेला मोबाईल व 2200 रुपये जप्त केले. आरोपी अजय येमुलवार हा सराईत असून 8 दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आल्याची माहिती आहे.