वणी टाईम्स न्युज : बायकोला विनाकारण शिवीगाळ व लाकडी काठीने मारहाण करणाऱ्या दारुड्या पती विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत एका गावातील फिर्यादी विवाहित महिला (26) हिने याबाबत 10 मार्च रोजी तक्रार नोंदविली होती.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती आपल्या पती व 4 वर्षाच्या मुलीसह गावातच सासू सासऱ्यापासून वेगळ्या घरात राहते. तसेच तिचा पति कोणताही कामधंदा करीत नसून त्याला दारू पिण्याची सवई आहे. दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी फिर्यादी ह्या आपल्या घराच्या अंगणात बसून असताना तिचा पती दारु पिऊन आला व शिवीगाळ करायला लागला.
विनाकारण शिव्या का देता ? अशी विचारणा केली असता आरोपी पतीने अंगणातील काठी उचलून तिच्या पायाला, खांद्यावर व पाठीवर मारहाण केली. पीडित महिलेनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती विरुध्द कलम 118(1), 352 BNS नुसार गुन्हा दाखल केला.