वणी टाईम्स न्युज : नातेवाईकाच्या लग्नात जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. लग्नात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पेंडेंट असलेली पोत लंपास केली. शहरातील नांदेपेरा मार्गावरील एका मंगल कार्यालयात 10 एप्रिल रोजी ही घटना घडली.
फिर्यादी महिला सरस्वती भालचंद्र गाताडे (58), रा. धुम्मस, ता. घुग्गुस, जि. चंद्रपूर हिने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 10 एप्रिल रोजी त्यांचे नातेवाईकांचे घरी लग्न असल्याने ती वणी येथे आली होती. मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरु असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने नकळत तिच्या गळ्यात असलेली जुनी वापरती साडे तीन तोळ्याची सोन्याची पोत ज्याची किंमत 1 लाख 13 हजार रुपये आहे हिसकावून चोरी केली. महिलेच्या फिर्यादवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 304 बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय धीरज गुल्हाने करीत आहे.