वणी टाईम्स न्युज : दारु पिऊन एकमेकांना मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या 7 युवकांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सेवानगर ते घोन्साकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी रात्री 1 वाजता दरम्यान समोर आली.
सेवानगर येथे काही युवकांमध्ये मारामारी सुरु असल्याची माहिती वरुन रात्री गस्तीवरील पोलीस कर्मचारी रात्री 1 वाजता सेवानगर येथे पोहचले. सेवानगर ते घोन्साकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर काही युवक रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी करून मारामारी करताना करताना दिसले. पोलिसांनी सर्व युवकांना ताब्यात घेऊन मारामारी करण्याचे कारण विचारले असता दारू पिऊन घरासमोर ओकारी केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याचे सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा आरोपावरून पोलिसांनी अंकुश मोगरे (25), हरशू बिसमोरे (22) दोघं रा. सेवानगर, ओम बिजलवार (20) रा. टागोर चौक, रजनीकांत वल्लरवार (33), जगसाई सुरपाम (20), अभिषेक बदकी (19), प्रजोत सोनटक्के (22) सर्व रा. रासा, ता. वणी यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता सर्व आरोपींनी मद्य प्राशन करून असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 194 (2) BNS नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार विठ्ठल बुरेवार करीत आहे.