वणी टाईम्स न्युज : गावात शेजारी घर असलेल्या लहान बालकांमध्ये झालेला वाद कुटुंबियांनी मनावर घेऊन एकमेकांशी वाद घातला. दोन्ही कुटुंबातील महिला पुरुषांनी एकमेकांना येथेच्छ अश्लील शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. शेवटी दोन्ही कुटुंब पोलीस ठाण्यात पोहचले आणि एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदविली.
मारेगाव तालुक्यातील शिवणी (धोबे) येथे मारोती सिडाम व दीपक सोयाम हे शेजारी राहतात. 8 मार्च रोजी सायंकाळी मारोती सिडाम यांच्या 9 वर्षीय मुलाचा शेजारील मुलीसोबत वाद झाला. त्यामुळे मुलीचे वडिल दीपक सोयाम यांनी मुलाला थोड दपटले. याच कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार भांडण व शिवीगाळ झाले.
फिर्यादी मारोती सिडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक बबन सोयाम (33) रा. शिवणी (धोबे) विरुद्ध कलम 296, 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला. तर फिर्यादी रुपाली दीपक सोयाम हिने दिलेल्या फिर्यादवरून मारोती गोपीचंद सिडाम, दिपाली मारोती सिडाम व कांता गोपीचंद सिडाम सर्व रा. शिवणी (धोबे) विरोधात कलम 296, 3(5), 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला.