सुशिल ओझा, झरी : वणी उपविभागात विविध कारणाने आत्महत्या करणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. मारेगाव तालुक्यात सतत आत्महत्येच्या घटनेनंतर आता आदिवासी बहुल झरी तालुक्यालासुद्धा आत्महत्येचा ग्रहण लागला कि काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत मागील 3 दिवसात दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सिंधीवाढोणा येथील शेतकरी मारोती नामदेव अवताडे यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शाई वाळत नाही तर आमलोन येथे अल्पभु धारक शेतकरी यांनी घरातच गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली.
आनंदराव शंकर मेश्राम (50) रा. आमलोन ता. झरी, असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचा नाव आहे. आनंदराव मेश्राम याची पत्नी व मुलगा काही कामानिम्मित सोमवारी वणीत मुकामी आले होते. घरी एकटाच असताना आनंदराव यांनी रात्रीच्या दरम्यान पाळण्याच्या फाट्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगलवार 19 डिसे. रोजी सकाळी. 7.30 वाजता दरम्यान हि घटना उघडकीस आली.
घटनेबाबत नागरिकांनी मुकुटबन पोलिसांना फोनवर माहिती दिली. माहितीवरून ठाणेदार सुरेश मस्के यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेह खाली उतरविला. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतक आनंदराव याच्या मागे पत्नी, मुलगा व एक विवाहित मुलगी आहे. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.