वणी टाईम्स न्युज : वणी शहर आणि ग्रामीण भागातून बाईक चोरी होण्याच्या घटना सतत समोर येत आहे. गुरुवारी नांदेपेरा येथील एका शेतकऱ्याची मोटरसायकल मजरा शेत शिवारातून चोरट्यांनी लंपास केली. फिर्यादी महेंद्र मारोती निखाडे (44) रा. नांदेपेरा हा गुरुवारी मजरा शेत शिवारात आपल्या शेतात गेला होता. त्यावेळी त्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्रमांक MH29 AG 2339 बोर्डे यांचे शेताच्या बाजूला उभी केली होती.
सायंकाळी 4.30 वाजता महेंद्र शेतातून परत घरी जाण्यासाठी निघाला असता ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही. आजू बाजूच्या शेतात तसेच नांदेपेरा गावात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. शेवटी फिर्यादी यांनी वणी पोलीस ठाण्यात त्याची मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303(2)BNS नुसार गुन्हा दाखल केला.