सुशील ओझा, झरी : यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या संख्येत शनिवारी आणखी एक आकडा वाढला. झरी जामणी तालुक्यातील सिंदीवाढोणा येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झाडाला गळफास लावून मृत्यला कवटाळले. मारोती नामदेव अवताडे (47) असा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा नाव आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता दरम्यान ही घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार सिंदीवाढोणा येथील शेतकरी मारोती अवताडे यांच्या कडे 4 एकर शेती आहे. अल्प जमिनीवर उत्पन्न काढू जस तस आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 2.50 लाख, रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्थेचा जवळपास 2 लाख तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर व्यापारी मित्र नागरी संस्थेचा 80 हजाराचा कर्ज आहे. यंदा त्यांच्या शेतात फक्त 15 क्विंटल कापसाचा उत्पादन झाला. कर्जाचा डोंगर उभा असताना फक्त 15 क्विंटल कापसाच्या भरवश्यावर कर्ज कसा फेडणार. याची चिंता नेहमी सतावत होती.
शुक्रवारी सायंकाळी मारोती हा शेतात गेला तर रात्री घरी आलाच नाही. शनीवारी सकाळी मुलगा सौरभ यांनी शेतात जाऊन पाहिले तर वडील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरविला. घटनेबाबत मुकुटबन पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय वणी येथे शव विच्छेदन करण्यात आले. मृतक मारोती याच्या मागे पत्नी, मुलगा व एक विवाहित मुलगी आहे.