मारेगाव न्युज : वडिलोपार्जित शेतीची वहितीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. सदर घटना मारेगाव तालुक्यातील सगनापुर येथे 19 जून रोजी सायंकाळी घडली. फिर्यादी संतोष हरी वानखेडे (51) रा. सगनापुर यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी मोठे भाऊ विवेक हरी वानखेडे (60) रा. सावर्ला, ता. वणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचे आई वडिलांचे निधन झाले असून त्यांचे नावाने असलेली 05 एकर शेतीचे 4 भाऊ आणि 2 बहिणी वारसदार आहेत. फिर्यादी व त्याचे भाऊ त्या शेतात वाहिती करतात. फिर्यादीचा मोठा भाऊ विवेक हरी वानखेडे हा त्याच्या हिश्यातील शेती दरवर्षी फिर्यादी याला वहीतीसाठी देत असे. मात्र शेतीमध्ये सतत नापिकी होत असल्याने यंदा भावाच्या हिश्याची वाहीती फिर्यादी यांनी केली नाही.
दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 6.30 वा . दरम्यान फिर्यादी हा आपल्या घराच्या आंगणात बसून होता. तेव्हा त्याचा मोठा भाऊ विवेक वानखेडे लाकडी काठी घेऊन तिथे आला व तू वडिलांच्या शेतीवर वहिती का केली ? असे विचारून लहान भावाच्या पाठीवर, हातावर लाकडी काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी 20 जून रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात त्याचे मोठे भाऊ आरोपी विवेक हरी वानखेडे (60) रा.सावर्ला, ता. वणी विरुद्ध कलम 326, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला.