वणी टाईम्स न्युज : येथील तेलीफेल मोहल्यात राहून मिस्त्री काम करणाऱ्या युवकाचा सोमवारी भूरकी शिवारात वर्धा नदी काठावर झाडाला गळफास घेऊन कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अर्जुन हरीभाऊ काळे (28) असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतक अर्जुन हा 18 तारखेपासून घरून बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे मित्र बाळू पडोळे यांनी 19 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात नोंदवली होती.