वणी टाईम्स न्युज :मुलीने शेजारील मुलासोबत पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं. या रागातून मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या आई, वहिनी, बहीण व भावाला मारहाण केली. फिर्यादी दीक्षा मुन्ना चाफडे (26) रा. रंगनाथ नगर हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 3 महिलांसह 6 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार फिर्यादी हिचा भाऊ हर्षल चाफड़े यानी 20 दिवसांपूर्वी शेजारील मुलीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. या कारणावरून मुलीची आई व इतर लोकं त्यांना शिवीगाळ करायचे. दिनांक 15 एप्रिल रोजी मुलीची आई फिर्यादी हिच्या वहिनीला शिवीगाळ करत होती. तेव्हा तिची वहिनीने तुम्ही आम्हाला कशाला शिवीगाळ करता? आमचा काय दोष आहे. असे विचारले असता तिनं वहिनीचे केस ओढून थापड बुक्क्यांनी मारहाण केली.
वहिनीला सोडविण्याकरिता फिर्यादीची आई, भाऊ, व ती मधात गेली असता गैरअर्जदार कुटुंबातील महिला पुरुषांनी थापड बुक्क्यांनी तसेच लाकडी सेंटरिंग प्लेट मारून जखमी केले. तसेच घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी साहिल अनिल झाडे, सुजल अनिल झाडे ,अनिल किसन झाडे तसेच इतर 3 सर्व रा. रंगनाथ नगर वणी यांचे विरुद्ध कलम 115(2), 118 (1), 189(2), 189(4), 190 191(2), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे.