वणी टाईम्स न्युज : माझ्या शेतातील धुऱ्यावरून का गेली ? अस म्हणून महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन चापट मारल्याच्या तक्रारीवरुन आरोपी विरुध्द मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम विजय सिडाम (35), रा. खैरगाव (बुटी) ता. मारेगाव असे आरोपीचे नाव आहे.
खैरगाव (बुटी) येथीलच महिलेची दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आणि तिचा शेत लागून आहे. दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता नेहमीप्रमाणे शेतात गेली होती. शेतातून परत घरी आल्यावर आरोपी शुभम सिडाम तिच्या मागे आला आणि तू माझ्या शेतातील धुऱ्यावरुन का गेली? यापुढे धुऱ्यावरुन गेली तर जिवानिशी मारेन. अस म्हणून फिर्यादीनुसार गालावर चापट मारली. तसेच अश्लील शिवीगाळ केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 296, 351(2), 352, 351(3) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
50 हजाराचा साऊंड सिस्टीम साहित्य लंपास
तालुक्यातील कुंभा येथे सांस्कृतिक भवन मध्ये ठेवलेले साऊंड सिस्टीम साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले. फिर्यादी निखिल महादेवराव.महाडूले (33) रा. कुंभा, ता. मारेगाव यांनी याबाबत 28 ऑगस्ट रोजी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे.
नवरोबा दुसरीच्या घरात, महिलांमध्ये भांडण
संशयावरून नवऱ्याचा पाठलाग करीत बायको दुसऱ्या महिलेच्या घरी पोहचली. माझ्या नवऱ्याला तुझ्या घरातून बाहेर पाठव, अस म्हटलं असता त्या महिलेने तिला शिवीगाळ करुन लाकडी काठीने डोक्यावर व हातावर मारुन जखमी केलं. गावातीलच इतर महिलांनी दोघींचे भांडण सोडविले.
सदर घटना मारेगाव तालुक्यातील एका गावात 25 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता घडली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गैर अर्जदार महीले विरुध्द कलम 118(1), 351(2), 352, 351(3) नुसार गुन्हा केला. पुढील तपास हे. कॉ. दिगांबर किनाके करीत आहे.