वणी : शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत एका गावात सद्य आईवडिलांसोबत वास्तव्यास विवाहित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरकडील चोघांवर शिरपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न सन 2021 मध्ये चिकणी ता वरोरा जि चंद्रपुर येथील अतुल महादेव माथनकर यांचे सोबत रितीरिवाजाप्रमाणे झाले. लग्नात तिच्या वडिलांनी 27 ग्रॅमची सोन्याची पोत, 12 ग्रॅमचा गोप, व 4 ग्रॅमची सोन्याची अंगठी तसेच घरगुती वापरण्याकरीता दिवान, कपाट, फ्रिज, मिक्सर असे सर्व साहित्य दिले होते.
लग्नाच्या एका महिन्यानंतरच तिचा पती चारित्र्यावर संशय घेऊन तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी तिला मारझोड करायचं. तर तिची सासू, सासरे व विवाहित नणंद पतीला तिच्या विरुद्ध भडकावून शारीरिक व मानसिक छळ करण्यास प्रोत्साहित करायचे. एवढे नव्हे तर ती चार महिन्याची गरोदर असताना शेतात जावून पतीने तिला मारहाण केली. नोव्हेंबर 2021 मध्ये प्रसूतीसाठी तिचे आईवडील तिला माहेरी घेऊन आले. माहेरीच तीन एक गोंडस बाळाला जन्म दिला. आणि तेव्हा पासून ती आईवडिलांकडेच राहत आहे.
विवाहित युवतीने पतीसह सासरकडील मंडळीने शारीरिक व मानसीक छळ केल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पती पत्नी दरम्यान वाद असल्याने पोलिसांनी सदर प्रकरण पांढरकवडा येथील महिला भरोसा सेलकडे पाठविले. भरोसा सेल अधिकाऱ्यांनी दोघांमध्ये समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र समेट तडजोड न झाल्याने पिडीतेनी 13 दिसें. 2023 रोजी आपल्या आईसह शिरपूर पोलीस ठाणे गाठून पती, सासरे, सासू व नणंद विरुद्द हुंड्याची मागणी, शारीरिक व मानसिक त्रास दिल्याची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अतुल महादेव माथनकर (37), महादेव नानाजी माथनकर (65), सिंधु महादेव माथनकर (60) सर्व रा. चिकणी पो. स्टे. वरोरा, जि. चंद्रपूर व नुतन विकास जरीले (33) रा. पांढरकवडा ता.मारेगाव विरुद्द कलम 323, 498(A), 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.