वणी टाईम्स न्युज : पिकअप मालवाहू वाहनात गोवंश जनावरांना निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी आदिलाबाद येथे नेत असताना स्था. गुन्हा शाखा (LCB) पथकाने पकडुन 12 जनावरांची सुटका केली. वणी मुकुटबन मार्गावर रविवार 23 जून रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी 4 पिकअप वाहन जप्त करून वाहन चालकांना अटक केली आहे.
वरोरा, वणी , मुकुटबन मार्गे आदिलाबाद येथे कत्तलिसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहितीवरुन पोलीस पथकाने रविवारी पेटुर गावासमोर नाकाबंदी केली. सायंकाळी 5 वाजता दरम्यान वणी कडून येणाऱ्या एका पाठोपाठ एक असे 4 पिकअप वाहनांना थांबवून वाहनांची पाहणी केली असता त्यात 12 गोवंशीय जनावर कोंबून आढळले. पोलिसांनी पिकअप वाहन चालकांना विचारणा केली असता सदर जनावरे मुकुटबन येथील सैयद खय्याम सैयद गफार याचे मालकीचे असून कत्तलीसाठी आदिलाबाद येथे नेत असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी वाहनातील सर्व जनावरांची सुटका करून त्यांच्या चाऱ्यापाण्याची व्यवस्थेकरिता रासा येथील गुरू गणेश गौशालाचे सुपूर्द केले. तसेच अवैधरीत्या जनावर वाहतूक करणारे आरोपी अक्षय अनिल करलुके (28), रा. नेरड (पुरड), नितेश रवींद्र किनाके (22), रा. वंदली, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, निलेश बंडू कोल्हे (28) रा. लोणाराता, ता. समुद्रपूर जि. वर्धा व सय्यद शाकीर सय्यद मेहमूद (32), रा. चिखलवर्धा ता. घाटंजी, जि. यवतमाळ यास अटक केली. तसेच जनावर वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH-29 BE 6324, MH-32 AJ 0237, MH-07 P 3638 व एक विना नंबरचा वाहन किंमत 23 लाख पोलिसांनी जप्त केले.
सदर कार्यवाही डॉ. पवन बनसोड जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, आधार सिंग सोनोने पो. नि. एलसीबी यांचे मार्गदर्शनात एपीआय अमोल मुडे, पीएसआय रामेश्वर कांडुरे, पोलीस अमलदार उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सतीश फुके यांनी पार पाडली.