वणी टाईम्स न्युज : विवाहित महिलेला ‘तू अपने पति व लड़की को छोड़ कर मुझसे शादी कर ले’ म्हणत विनयभंग करणाऱ्या इसमाविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफ खान सुबेदार खान (50) रा. इंदिरा चौक वणी असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी विवाहित महिला (40) रा. वणी हिने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तिला वारंवार ‘तू नवऱ्याला सोडून दे, मी तुझ्या सोबत लग्न करतो’ असं म्हणत होता. तर तिच्या 24 वर्षाच्या मुलीला सुध्दा डोळ्याने चुकीचे इशारे करून तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य करीत असतो. इसमाच्या कृत्यांना त्रस्त महिलेने 16 जानेवारी रोजी आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 74,75, 352 BNS अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पीएसआय सुदाम आसोरे करीत आहे.