वणी टाईम्स न्युज : जेवणाचा ताट आपटून का ठेवला? असा आरोप करून पतीने पत्नीचे केस धरून जिन्यावर डोकं आपटले. तसेच नाका तोंडावर बुक्क्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केला. खाजगी दवाखान्यात उपचारानंतर पीडित पत्नीने वणी पोलीस ठाण्यात आरोपी पती विरुध्द तक्रार नोंदविली.
फिर्यादी महिला गावात वास्तव्यास असून तिला 3 मुली आहे. तिची 2 मुली नागपूर येथे शिक्षण घेत आहे, तर लहान मुलगी तिच्याजवळ राहते. फिर्यादी महिलेचे पती सोबत पटत नसून तिचा पती मागील 2 वर्षापासून वणी येथे त्याच्या बहिणीकडे राहत होता. दोन महिन्यांपूर्वी तो परत घरी आला होता. दिनांक 9 जानेवारी रोजी रात्री पत्नीने जेवणाचे ताट आणून दिले असता आरोपी पतीने ताट आपटून का ठेवलं ? अस म्हणत बेडरूम मधून पत्नीचे केस पकडून बाहेर ओढत नेले व जिन्यावर तिचे डोकं आपटले.
आरोपी पतीने पत्नीचे नाकावर व तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे तिच्या डोक्यातून व नाकातून रक्त निघाले. आईला मारहाण होत असल्याचे बघून तिला सोडविण्यासाठी मध्ये आलेली तिची लहान मुलीला सुध्दा आरोपी वडिलांनी मारहाण केली व तिचा मोबाईल फेकून फोडून दिला. वडिलांनी मारहाण केल्याने आई जखमी झाल्याची माहिती मिळताच दोन्ही मोठी मुली नागपूरहून गावी पोहचल्या व त्यांनी आईला वणी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. उपचारानंतर फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी पती राजू लटारी बोडेकर विरुध्द 118(1), 351(2), 351(3), 352 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे.