वणी : लग्नाच्या काही वर्षानंतर पतीने मानसिक व शारीरिक छळ तसेच मारहाण केल्याची तक्रार दोन विवाहित महिलांनी 26 नोव्हे. रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात नोंदविली. महिलांच्या तक्रारीवरुन दोघांच्या पती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले. महेश शामराव आसुटकर व प्रवीण सुरेश कोटटे असे दोन्ही पतिदेवचे नाव आहे.
पहिल्या तक्रारीत विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये प्रवीण सुरेश कोटटे (32) रा. भांदेवाडा WCL कॉलोनी सोबत रितीरिवाजाप्रमाणे झाले. लग्नानंतर 3 महिने नवऱ्याने तिला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर तिचा मानसिक व शारीरिक छळ करून घराबाहेर काढून देत होता. त्यामुळे ती दोन महिन्यापूर्वी तिच्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन वडिलांकडे मारेगाव येथे राहायला आली. 26 नोव्हे. रोजी फिर्यादी महिला वडिलांच्या घरी असताना प्रवीण तिथे आला व फिर्यादी पत्नी सह तिच्या आई वडील यांना शिवीगाळ व मारहाण केली.
दुसऱ्या तक्रारीत फिर्यादी विवाहितेने तिचे पती महेश शामराव आसुटकर (41), रा. परसगाव मासळ, जि. चंद्रपूर विरुध्द वरील प्रमाणेच लग्नानंतर मानसिक, शारीरिक छळ तसेच माहेरी येऊन तिला आणि वडिलांना शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार नोंदविली.
दोन्ही महिलांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रवीण सुरेश कोटटे (32) रा. WCL कॉलोनी भांदेवाडा विरुध्द कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. तर आरोपी महेश शामराव आसुटकर (41), रा. परसगाव मासळ, जि. चंद्रपूर विरुद्ध 325, 323, 504, 506 भादवि नुसार गुन्हा नोंद केला.