वणी टाईम्स न्युज : विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपी विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात वास्तव्यास पीडित विवाहित महिलेनी रविवार 6 एप्रिल रोजी याबाबत तक्रार नोंदविली आहे. नितेश कोंगरे (36), रा. वणी असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी विवाहित महिला (31) हिला दोन मुलं असून ती शहरात एका भागात कुटुंबासह वास्तव्यास आहे. आरोपी नितेश सोबत तिची ओळख होती. आरोपी हा स्वतः विवाहित असताना महिलेला तू मला खूप आवडते, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असा प्रलोभन देउन तिला प्रेम जाळ्यात अडकविले. प्रेम संबंधातून आरोपीने महिलेसोबत मार्च 2023 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंधादरम्यान आरोपीने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले.
मागील काही महिन्यापासून पीडितेने आरोपीसोबत बोलणे भेटणे कमी केले. त्यामुळे आरोपीने तू जर आली नाही तर तुझी अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करणार तसेच तुझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर पाठवणार, अशी धमकी पीडितेला देत होता. आरोपीच्या सततच्या धमक्या व त्रासाला कंटाळून शेवटी पीडित विवाहित महिलेने रविवारी वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध लग्नाचे खोटे आमिष दाखवून शारीरिक शोषण तसेच अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याची तक्रार नोंदविली.
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितेश कोंगरे (36) रा. वणी विरुद्ध 69, 351 (2)(3) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास PSI अश्विनी रायबोले करीत आहे.